Ad will apear here
Next
‘स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी महत्वाची’
सोलापूर :  विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ‘ड्रीम फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले रविराज कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. ‘ड्रीम आयएएस सेंटर’ येथे दोन जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र रविराज यांनी दिला. ‘आपण कोणती परीक्षा देणार त्या परीक्षेची माहिती करून घ्या, रोज नियोजनपूर्ण अभ्यास करा, एक क्षणही वाया घालवू नका,’ असा सल्ला त्यांनी दिला. 

या वेळी संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी अभ्यासाचे नियोजन यावर चर्चा केली. विद्यार्थी अपयशी का होतात हे मार्मिक पद्धतीने त्यांनी समजावले. पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी यासह निबंधलेखन कसे करावे, हेही त्यांनी सांगितले. ‘रोज किमान १० तास अभ्यास करा, नियोजन खूप महत्त्वाचे आहे, पुस्तकांचा संग्रह करा, रोज चर्चा करा,’ असे उपयुक्त मुद्देही त्यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZVHBE
Similar Posts
पर्यावरणदिनानिमित्त सायकल रॅली सोलापूर :   ड्रीम फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने पर्यावरण जागर सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश त्यातून देण्यात आला. यशवंतराव चव्हाण पुतळा ते स्मृती उद्यान या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या
शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार समारंभ सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या 'ड्रीम आयएएस सेंटर'तर्फे दोन सप्टेंबर रोजी 'डॉ. कलाम टीचर इन्स्पायर अॅवॉर्ड २०१७' देण्यात येणार आहे. खासदार बसवराज पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. शिवरत्न शेटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. महापौर
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
काशिनाथ भतगुणकी यांची प्रेरणादायी वाटचाल सोलापूर : छोट्या शहरात वाढलेला, वेटर, हमाल, बिगारी मजूर म्हणून काम करणारा एक गरीब मुलगा, मोठेपणी अटकेपार झेंडा रोवून यशस्वी उद्योजक आणि प्रभावी वक्ता होतो. एवढेच नव्हे तर हजारो तरुणांना प्रेरणा देत नवी दिशा देतो, हे अशक्यप्राय वाटते पण हे सत्य आहे. किशोर भतगुणकी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येते हे सिद्ध केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language